Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.
Send us a textलहानपणापासून मुलांना आपण काऊ- चिऊच्या गोष्टी सांगतो. त्यातूनच त्यांचे संवेदनाक्षम मन निसर्गाकडे जाऊ लागते . ह्या सुंदर गोष्टीचा निसर्गाच्या माध्यमातून आढावा घ्यायचा प्रयत्न.
Send us a textरस्त्या वरच्या प्रवासात आपल्याला कधी कधी अशी माणसं भेटतात, जी फक्त आपली गाडी चालवत नसतात तर ते आपल्या जीवाचं रक्षणही करत असतात. त्यांची नजर रस्त्यावर असते, पण मन सतत आपल्या सुरक्षेवर. पण दुर्दैवाने, आपण त्यांचा अनुभव दुर्लक्षित करतो. आणि मग रस्त्यावरचा तो प्रसंग आपल्याला चांगलाच धडा शिकवतो!
Send us a textज्योतिष सांगण्याच्या बहाण्याने एखाद्या व्यक्तीच्या गोड बोलण्याला फसून संपूर्ण कुटुंब त्याच्या कह्यात जाते, ही खोटी वाटत असली तरी सत्य घटना असू शकते हे लता-गोविंदच्या कुटुंबाचे निघालेले वाभाडे ऐकल्यावर पटतं. मात्र घरातला एक जरी माणूस विचारी असेल तर ते घर खूप काही सोसूनही पुन्हा उभं राहू शकत त्याचीच ही कहाणी.
Send us a text'द ट्रुमन शो' हा एक प्रसिद्ध इंग्रजी चित्रपट आहे. ही ट्रुमन बरबँक नावाच्या एका माणसाची कथा आहे, जो एक सामान्य आणि आनंदी जीवन जगतो. तो सीहेवन नावाच्या एका सुंदर, शांत आणि परिपूर्ण शहरात राहतो. त्याचे मित्र आहेत, त्याची पत्नी आहे आणि एक चांगली नोकरी आहे. पण त्याला एक गोष्ट माहीत नसते - त्याचे संपूर्ण आयुष्य एक असत्य किंवा काल्पनिक आहे. तो जन्मापासून एका विशाल स्टुडिओमध्ये (जो शहरासारखा दिसतो) राहत आहे आणि त्याचे आयुष्य हा २४ तास चालणारा, जगभरात प्रसारित होणारा एक प्रचंड लोकप्रिय रिॲलिटी टीव्ही शो आहे.या चित्रपटातील नायकाप्रमाणेच, "आपल्यासमोर जे जग सादर केले जाते, तेच आपण वास्तव म्हणून स्वीकारतो." आपणही आपापल्या 'अमवेल्ट' स्वीकारतो आणि तिथेच थांबतो.
Send us a text"अगं पण दुधातलं कॅल्शियम त्याला मिळतं का?" हा प्रश्न तर एकदम चक्रावून टाकणारा आहे..म्हणजे आदिमानवापासून जे जे फक्त दूध पीत आलेत ते सगळे वेडे.. आणि त्यात हॉर्लीक्स मिसळणारेच तेवढे हुशार!! ह्यांनाच फक्त दुधातलं कॅल्शियम मिळतं..... आणि वर, मुन्ने का हॉर्लिक्स अलग, मुन्ने की मम्मी का अलग, और मुन्ने के पापा का अलग...
Send us a textटोरेस स्कॅम मधले गुंतवणूकदार कोण होते?लोकलच्या गर्दीत चेंगरणारे, ऑटोचे पैसे वाचवायला बससाठी रांगेत उभे राहणारे, कांदा महाग आहे म्हणून कमी खाणारे, चप्पल तुटली तरी त्यावर महिने काढणारे, हॉटेलमधलं परवडत नाही म्हणून वडापाव खाणारे.... प्रत्येक सेकंदाला-मिनीटाला स्वतःच्या इच्छा मारत काटकसर करणाऱ्या १ लाख २५ हजार मुंबईकरांचे हजार कोटींपेक्षा जास्त पैसे या टोरेस स्कीम मध्ये कायमचे गेलेयत........कंपनीचा मालक युक्रेनला पळून गेलाय. यातून एक रुपया सुद्धा रिकव्हर होईल असं वाटत नाही!
Send us a textसोमालियातील तिच्या आयुष्यात होते आई-वडील, सहा भावंडं… एक उंट, दोन शेळ्या… आणि अफाट पसरलेले वाळवंट! अवघ्या पाचव्या वर्षी तिच्यावर स्त्री जननांग छेदनाची (FGM) भीषण प्रथा जबरदस्तीने लादली गेली. ती १३ वर्षांची असताना तिचं लग्न ६० वर्षांच्या माणसाशी ठरवण्यात आलं होतं — तो तीच्या वडिलांचा मित्र होता, आणि बदल्यात वडिलांना पाच उंट मिळणार होते.....हे ऐकले आणि ती पळाली....!
Send us a textओपन एआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांचं असं म्हणणं आहे की, चॅटजीपीटीला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी जवळपास एका चमच्याच्या पंधराव्या भागाएवढं पाणी लागतं.मात्र, अमेरिकेतील कॅलिफोर्निया आणि टेक्सासमध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासात असं आढळून आलं आहे की, कंपनीच्या जीपीटी-3 मॉडेलकडून 10 ते 50 प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी जवळपास अर्धा लीटर पाणी लागतं. याचा अर्थ, प्रत्येक उत्तरासाठी जवळपास 2 ते 10 चमचे पाणी वापरलं जातं.
Send us a textहत्तीच्या विमानप्रवासात कोंबडीची पिल्लं ठेवणं हे प्राण्यांच्या सुरक्षिततेच्या आणि कल्याणाच्या नियमांच्या पूर्ण विरोधात आहे.हत्तीला विशेष पिंजऱ्यात ठेवले जाते, प्रशिक्षित कर्मचारी असतो, त्याच्या मानसिक आणि शारीरिक गरजांची काळजी घेतली जाते.मग... ही कथा कुठून आली?ही आहे एक ‘रूपक कथा' – symbolic story.
Send us a textजनुकांपेक्षा सुद्धा आपल्या भोवतालची परिस्थिती जीवनपद्धती, उत्पन्न आणि सामाजिक घटक अकाली मरणास कारणीभूत असतात असे इंग्लंडमधील एका अभ्यास पाहणीतून पुढे आले आहे यु के बायो बेस बँकेकडे असलेल्या पाच लाख लोकांच्या माहितीच्या विश्लेषणावर हा अभ्यास आधारित आहे ही माहिती जमा करण्यासाठी नावे नोंदवल्यानंतर संबंधितांना विविध प्रश्न विचारले गेले. जसं, माणूस कोणत्या परिस्थितीत राहतो, तो धूम्रपान करतो का, त्याची वृद्धत्वाकडे वाटचाल कोणत्या टप्प्यावर आणि कशी सुरू झाली, तशी ती झाल्यानंतर त्याच्याशी संबंधित आजार त्याला होतात का याचाही तपास करण्यात आला.
Send us a textएकेकाळी, एक अतिशय सुंदर गोरी छोटी मुलगी होती जी नेहमी तिच्या आजीने दिलेली लाल टोपी घालायची. तिला ती इतकी आवडायची की ती कधीही टोपी काढत नसे; खरं तर, त्यामुळे, तिचं नाव काहीही असलं तरी सर्वांसाठी ती फक्त ‘लिटिल रेड रायडिंग हूड‘ नावाची मुलगी होती.
Send us a textनुकतीच शाळा सुरू झाली असल्याने मुलांचा दंगा सुरुच होता. म्हणजे खेळ कमी आणि दंगा मस्तीच जास्ती. मग मी मुलांसोबत एक खेळ खेळलो आणि गंमत म्हणजे मला त्यांच्या पालकांविषयीच जास्त माहिती मिळाली. मुलांचा गोंधळ-गुंधळ सुरू होता म्हणून मी त्यांना म्हणालो, “चला, आपण शांततेचा एक नवीनच खेळ खेळूया.”मुले तयार झाली.
Send us a textसगळ्यात आधी गेल्यावर सिनियरच्या बायकोने समजावून सांगितलेली गोष्ट म्हणजे, "बघ शामली, फौजीशी लग्न केलस खरं, पण त्याच्याकडून सामान्य नवऱ्या सारख्या अपेक्षा ठेऊ नको. कितीही काही झालं तरी पहिलं त्याचे काम.., त्यानंतर त्याचा परिवार. आणि ही गोष्ट तुला मान्य करावी लागेल. आणि हो, जे जसं आहे त्यात आनंदी राहायला शिकावं लागेल."
Send us a textजॉय लोबो एक होतकरू इंजिनियर होता. तो 20 वर्षांचा होता. तो खूप हुशार होता. मेहनती पण होता. त्याने 2009 साली आपल्या इंजिनियरिंग कॉलेजच्या हॉस्टेलच्या रूम मध्ये बसून एक ड्रोन बनवला होता. पण त्यावेळच्या सरकारने त्याला म्हणावं तसं प्रोत्साहन दिलं नाही, उलट बाहेरच्या देशांमधून ड्रोन विकत घेतले तर दलाली खाता येईल म्हणून त्याचा प्रोजेक्ट 'फेल' करण्यात आला. नैराश्येतून तो शेवटी हॉस्टेलच्या त्याच खोलीत जिकडे त्याने ड्रोन बनवले होते, त्याने आपला जीव दिला. तुम्हाला आठवत असेल, हा सीन थ्री इडियट्स चित्रपटात पण दाखवला होता.
Send us a textअचानक जुनी वाचलेली बातमी आठवली ज्यात लिहिले होते कि एकाचवेळी, एकाच ठिकाणी शिकागो अमेरिका येथे एक हजार पक्षी मरण पावलेले आढळले. इतक्यात आपल्याच देशातील जैसलमेर येथे वीज वाहिन्यांमुळे १९००० पक्षी मरण पावले. हे सर्व सत्य असलं तरी त्या दिवशी माझ्या मनात कायम येत गेलं कि, कित्येक वर्षे मी या माझ्या मित्रांना चिवचिवाट करतांना, भांडतांना, मारामार्या करतांना बघीतलेय पण आज पर्यंत कधी एका पक्ष्याला पण झाडाखाली मरुन पडलाय किंवा अजुन कोणत्याही परिसरात नैसर्गिक रित्या मृत पडलाय असे बघीतलेलं नाही. नव्हे जगात कुठेही सहसा असे आढळत नाही.
Send us a textबोलता बोलता त्यातली एक ‘आमच्या आई ना....' करत सुरू झाली. ‘आमच्या आई' म्हटल्याबरोबर लक्षात आलं की आता सासुबाईंची काही खैर नाही. मधूनच काही ऐकू येत होतं, तर मधूनच काही त्यांच्या हसण्या खिदळण्यात विरून जात होतं. बहुतेक त्या मैत्रिणी मैत्रिणीच आल्या असाव्यात. बोलण्यावरून तरी त्या मुंबईच्या वाटत होत्या. एक तुटक वाक्य ऐकू आलं, ‘अगं, असं वाटतं ना कधी कधी ...' हे वाक्य दोन वेळा पाठोपाठ बोललं गेलं. त्यामुळे बोलण्यातील तीव्रता, भावनांची तीव्रता, सासू-सुनेचं नातं कसं असेल याची कल्पना आली.
Send us a textदहिवडी बसस्थानकावर तिकिटासाठी ७ रुपये नसल्याने तिष्ठत बसलेले धनाजी जगदाळे यांना ४०,००० रुपयांचे बंडल सापडले. हे पैसे प्रामाणिकपणे परत करत मनाने धनवान असलेला धनाजीने ते बक्षीस नाकारले. म्हणाला, " तुमचे पैसे तुम्हाला मिळाले. आता तुम्ही तुमच्या बायकोचे ऑपरेशन करू शकता यात मला सर्व काही मिळाले". आणि फक्त तिकिटासाठी ७ रुपयेच घेतले. ही केवळ प्रामाणिकतेची गोष्ट नाही, तर माणुसकीचीही आहे!
Send us a textसकासकाळी, बँकेच्या आवारात एक म्हातारी ओरडत, हुज्जत घालत होती. तिचं एकच म्हणणं होतं, "तुम्हीच खाताय माझे पैसे."अमरनाथने तिला काही न बोलता पाचशे रुपयांच्या नोटा काढून दिल्या.ती क्षणभर गोंधळली. दीड वर्ष सरलं. दर महिन्याला ती तिच्या हक्काच्या पेन्शनचे अमरनाथकडून पैसे घेत राहिली…मुख्य साहेबांनी तिला खरं सांगितलं.“आज्जी, तुमची पेन्शन सरकारकडून गेल्या दीड वर्षांपूर्वीच बंद झाली आहे.अमरनाथ साहेब दर महिन्याला तुम्हाला त्यांच्या पगारातून तुमची पेन्शन द्यायचे. आज त्यांना अपघात झालाय.” .......लेखक: अमोल अ. पवार, उंब्रज. 9970773576; 079727 85133
Send us a textओडिशात अगदी निर्मनुष्य जंगलात पडझड झालेले पुरातन मंदिर असले तरी तिथे गाभाऱ्यात दिवा तेवत असलेला दिसतोच दिसतो! चैत्र - वैशाखाच्या कडकडीत उन्हाच्या तडाख्याने सगळे ओडिशा त्रस्त झालेले असते. प्रचंड उकाड्याने त्रस्त झालेले महाप्रभू शेवटी पुरीच्या राजाला निरोप पाठवतात, "मला थंड पाण्याने स्नान करायची इच्छा आहे!" मग मोकळ्या हवेत, सकाळी सकाळी, विहिरीच्या १०८ हंडे थंड पाण्याने स्नान केल्याने त्याच दिवशी जगन्नाथ, बलभद्र व सुभद्रा ह्या तिघाही भावंडाना ज्वर चढतो! …..
Send us a textआज नेहमीप्रमाणे ती कामावर आली. टोमणे मारणाऱ्या गटाचा म्होरक्या काही अश्लील बोलत तिच्या पुढे गेला तशी ही वेगाने त्याच्या पुढ्यात जाऊन उभी राहिली. आसपासच्या सर्वांनीच श्वास रोखले. त्याच्याही लक्षात यायच्या आत तिने त्याच्या दोन थोबाडीत मारल्या. सर्वत्र स्मशान शांतता पसरली . "गेले अनेक महिने हकनाक तुमचा मानसिक छळ मी सोसते आहे. तो आज थांबेल ही अपेक्षा आहे व न थांबल्यास पुढील कायदेशीर प्रक्रियेस सामोरे जायची तयारी ठेवा. कदाचित तुम्हाला महिला कायदे वा सक्षम महिलेची क्षमता ठाऊक नसेल पण मी संविधान मानणारी आणि जाणणारी बाई आहे हे लक्षात ठेवा." ती उद्गारली.
Send us a textद्रौपदीला इतिहासाने आणि धर्मशास्त्राने तिला 'पतिव्रता' म्हणून मान्यता दिली. आख्यानकर असे सांगतात की ,कुठल्याशा समारंभाच्या वेळी तेजस्वी कर्ण द्रौपदीच्या नजरेस पडला.. त्याचं देखणेपण, तेज, व्यक्तिमत्त्व पाहून ती क्षणभर मोहीत झाली..क्षणभर तिच्या मनात विचार आला – हा सहावा पांडव असता तर?
Send us a textविठ्ठल भक्तीची ही भक्तिरसपूर्ण लोककथा आहे.संत चोखामेळा यांना सामाजिक बंधनामुळे त्यांना आत जाऊन दर्शन घेण्याचा अधिकार नव्हता . रात्री गाढ झोपेत असताना त्यांच्या घरी पांडुरंग आले. त्यांनी चोखोबांना जागे केले आणि हाताला धरुन मंदिराच्या गाभाऱ्यात नेले. तेथे देव त्यांच्याशी गुजगोष्टी करीत बसले. आपल्या कंठीचा हार त्यांच्या गळी घातला. तो प्रसिद्ध अभंग...धांव घालीं विठू आतां चालूं नको मंद । बडवे मज मारिति ऐसा कांहीं तरि अपराध ॥१॥
Send us a textशेर्पा तिच्यावर प्रचंड चिडला. आणि मला तुझ्यासोबत मरायचं नाहीये असं म्हणाला. कारण परिस्थिती खूप बिकट होती. शिखरावर भयानक वेगाने वारे वाहत होते. लवकरच वादळ येणार होतं. आणि सगळ्यात मोठं संकट म्हणजे प्राणवायू संपत होता. पण तिची जिद्द बघून तो शेर्पाही नतमस्तक झाला. तो म्हणाला, “अरुणिमा आता मी मेलो तरीही चालेल पण तुला एकटं सोडणार नाही! तुला जिवंत परत खाली घेऊन जाईन!”
Send us a textते रोजच्या प्रमाणे किराणा दुकान बंद करून गल्लीमध्ये थोडं पाय मोकळे करायला निघाले होते. इतक्यात एक गोड, कोवळी हाक आली —"काका… काका…"ते वळाले.७-८ वर्षांची एक चिमुरडी, धापा टाकत त्यांच्याकडे धावत येत होती."काय झालं गं... एवढी धावत आलीस?"काकांनी थोड्या थकलेल्या पण प्रेमळ स्वरात विचारलं."काका... पंधरा रुपयांचे तांदूळ आणि दहा रुपयांची डाळ घ्यायची होती..."मुलीच्या डोळ्यांत निरागसता आणि गरज दोन्ही स्पष्ट दिसत होती.काकांनी मागे वळून आपल्या दुकानाकडे पाहिलं."आता दुकान बंद केलं गं... सकाळी ये, मिळेल."
Send us a textपरवाच पत्नीबरोबरच्या सततच्या भांडणाला वैतागलेल्या एका गृहस्थांचा फोन आला. ते म्हणाले, "तुम्ही काउंसेलर आहात तर ही भांडणं थांबवण्याचा उपाय सांगा."मी त्यांना म्हटलं, "भांडणं पूर्ण थांबवता तर येणार नाहीत. पण तुम्ही भांडणाचे नियम पाळले तर त्यांची तीव्रता नक्कीच कमी होईल."
Send us a textएकदा वृंदावनला धार्मिक यात्रेस गेलो होतो. तिथं एकदा रामसुखदासजींचा सत्संग ऐकायला गेलो. प्रवचन संपल्यानंतर मी त्यांना विचारलं,"स्वामीजी, माझी ईश्वरावर नितांत श्रद्धा आहे, पण मला पूजाअर्चा, विधी वगैरे करणं फारसं जमत नाही. तरीही मला ईश्वराची कृपा कशी लाभेल?"स्वामीजी थोडा वेळ शांत राहिले. मग म्हणाले," भक्ती म्हणजे सेवा. जर आपण प्रत्येक प्राणीमात्रात ईश्वराचं रूप पाहिलं आणि मनापासून सेवा केली, तर तीच खरी भक्ती!"मग त्यांनी मला विचारलं,"तू काय करतोस?"" मी एक शिक्षक आहे.""मग तुझं कामच तुझी भक्ती समज. जर प्रत्येक व्यावसायिक आपल्या कामात सेवा आणि कृतज्ञतेची भावना ठेवेल, तर तो ईश्वराचीच सेवा करत असतो."
Send us a textगावातल्या म्हाताऱ्या कधीच रिटायर होत नाहीत. अगदी बिछान्याला खिळल्या तरी ओसरीत बाज टाकून पडल्या पडल्या अंगणातल्या वाळवणावर ध्यान ठेवतात. कधी रुपयाचा व्यवहार माहीत नाही, कधी मनासारखं काही नेसायचं घेता आलं नाही, चार मण्यांशिवाय अधिकचा मणी गळ्यात आला नाही. माहेरात मायबाप, भाऊ, भावजया शिल्लक नाहीत. असलीच तर दूरच्या कुठल्यातरी खेड्यात तीन लेकांनी वेगळ्या खोपटात ठेवलेली दुःखीसुखी सासुरवाशी एखादी बहीण. तिची ख्यालीखुशाली वर्ष-वर्ष मिळत नाही. जन्म जणू एक भोग होता अन् तो कधी एकदाचा सरतो याची वाट पाहत आयुष्य ढकलणाऱ्या या म्हाताऱ्या मरणासाठी धावा करत कुस बदलतात...
Send us a textतो त्याच्या मित्रांकडून आणि कार्यालयांकडून आणि म्हैसूरमधील इलेक्ट्रॉनिक कंपन्यांमध्ये जाऊन ई-कचरा म्हणून कीबोर्ड, माऊस, मदरबोर्ड आणि इतर संगणक उपकरणे गोळा करत असे आणि त्यावर संशोधन करत असे. आणि त्यातून ड्रोन बनवण्याचा प्रयत्न करत असे.तो दिवसा अभ्यास करत असे आणि काम करत असे आणि रात्री प्रयोग करत असे.सुमारे ८० प्रयत्नांनंतर, त्याने बनवलेला ड्रोन हवेत उडाला त्यावेळी तो तासभर आनंदाने रडला.ड्रोनच्या यशाची बातमी कळताच तो त्याच्या मित्रांमध्ये हिरो बनला.
Send us a textपुढील काही दिवसांत, डॅनियलला काहीतरी विचित्र गोष्ट जाणवली. त्या जुन्या घड्याळात वेगवेगळ्या प्रसंगी वेळेची गती वेगवेगळी होती: त्यात काही तास कायमचे टिकत होते, तर काही मात्र क्षणातच निघून गेले. कंटाळवाण्या बैठकांमध्ये, त्या घड्याळाचे हात हलत नव्हते. पण जेव्हा त्याने त्याच्या लहान मुलीसोबत जेवण घेतलं तेव्हा वेळ पटकन उडून गेला.तिसऱ्या दिवशी, डॅनियल दुकानात परत आला - उत्सुकतेने आणि थोडा अस्वस्थ. तो मार्टिनाला म्हणाला, "हे घड्याळ बिघडलेलं किंवा तुटलेलं आहे. यात वेळ अनियमितपणे फिरतो
Send us a textगावाभोवती चिंचेची झाडं का लावली पाहिजेत... याचं वैज्ञानिक कारण मारुती चित्तमपल्ली अतिशय आत्मीयतेने सांगत...चिंचेच्या झाडात विलक्षण अशी अर्थिंग क्षमता असते... पावसाळ्यात गावात विजा पडू नयेत म्हणून गावाभोवती चिंचेची झाडं लावावीत...जोपासावीत..वादळ- वा-यात विजा कडाडल्या तर चिंचेखाली उभं राहू नये...कारण हे झाड विजेला खेचून जमिनीत घेऊन जातं...! हे सारं त्यांच्या मुखातून ऐकताना श्रोते चकित होऊन जात.
Send us a text"बोला पुंडलिक वरदे हारी विठ्ठल" असा गजर झाला आणि सखुनी तुळशी वृंदावन डोक्यावर घेतल.म्हणाली, "तुळशीबाई चला निघुया वारीला...."वारीचा तो अनुपम सोहळा किती बघु आणि किती नको अस तुळशीला होऊन जायच..तिच्या कडे पाहत बाया जाता जाता म्हणत असलेलं कानी पडायचं. "तुळसा बाईचा हिरवा हिरवा पाला ग l कसा बाई तिने गोविंद वश केला ग ll"
Send us a text"का कुणास ठाऊक पण आजी देवांबरोबर बोलायची." रांगत्या बाळकृष्णला म्हणायची "अरे थांब थांब पळू नकोस आंघोळीच्या नावाने असा. तुला आंघोळ चुकायची नाही त्याने. मी मेली म्हातारी कुठं पर्यंत येइल तुझ्या मागे असं तुला वाटेल ,पण मी येईन हो पार गोकुळ मथुरे पर्यंत." एक दिवस आजी देवांशी प्रत्यक्ष संवाद साधायला निघून गेली इथे देव्हाऱ्यातले देवघरातले देव कायम चे निशब्द झाले!
Send us a textआई-बापानं ४०० रुपये हातावर ठेवले."हे घे. पण बघ, चांगले हापूसच घ्यायचे. आणि तुझे-तुझे पैसै वाचवून घ्यायचे. व्यवहार शिक. भाव करायला शीक." असं म्हणून पाठवलं.पोरगं धडपडलं.कधी एका गाड्यावर, कधी दुसऱ्या दुकानात. पण कोणीच ४०० च्या खाली एक डझन आंबे द्यायला तयार नव्हतं. कोणी म्हणे ५००, कोणी ४८०.डोळ्यात थोडं नाराजीनं पाणी आलं.पण मागे फिरणार नव्हता.आईचं बोलणं आठवत होतं, "हुशारी म्हणजे फक्त पुस्तकात नाही, व्यवहारात पण शहाणपण लागतं."
Send us a textमला नेहमीच नाचावसं वाटतं , आषाढाच्या सरीवर सरी पडू लागल्या की मला नाचावसं वाटतं ओट्यावरच्या पत्र्यावर पावसाचे थेंब पडू लागले आणि ताशा वाजू लागला की मला नाचावसं वाटतं ,अंगणात पाऊलभर पाणी साचलं की अगदी ओरडत ओरडत त्यात नाचावसं वाटतं पण आई मला तसं करू देत नाही
Send us a textश्रद्धा ताईंच्या निवृत्तीनंतर सुनेची वाघनखं बाहेर पडली होती. ती दोघंही नोकरीची असल्याने नातू आणि घर ही जबाबदारी ताईंवर आली . बाळाची केअर टेकर , पोळीवाली बाई बंद झाली. वाढत्या वयानंतर नोकरीतून माणूस निवृत्त होतो . पण बाईला संसारातून निवृत्त होताच येत नाही . उलट जबबाबदाऱ्या वाढतच जातात. तरीही त्या सांभाळून , श्रध्दाताई वेळात वेळ काढून आपला लेखनाचा छंद जपत होत्या. नेमकं तेच सुनेला खटकत होतं . लॅपटॉप वर , मोबाईलवर ती त्यांना लिहिण्याची कामच करू देत नसे. " जागरण करू नका, आराम करा "अशी उसनी काळजी दाखवत त्यांचा छंद तिने जवळ जवळ बंदच केला होता. बाहेरचे सर्व कार्यक्रम बंद झाले होते ते एकटं जायचं नाही या कारणास्तव . वरून , या लेखनातून काय पैसा मिळणार आहे का? वाचतं कोण ही मराठी पुस्तकं आजकाल ? हे बोलणं असायचंच .
Send us a textदुसऱ्या दिवशी भल्या सकाळीच सर्वजीत बैलावर आपली ग्रंथ संपदा लादून काशीच्या दिशेने निघाला व यथावकाश कबीरांच्या घरी पोहोचला. आपल्या येण्याचं प्रयोजन त्याने कबीरास सांगितले व लगेचच आपण वाद सुरू करू म्हणाला. कबीर म्हणाले की "मी एक अडाणी, गावंढळ माणूस आहे. वाचणं लिहिणं मला येत नाही. त्यामुळे वाद सुरू करू नकोस. मी आधीच हरलोय".
Send us a text'सांगली' जिल्ह्यात कृष्णा नदीच्या काठावर 'बहे-बोरगाव' नावाचे बेट आहे. हे गाव वाळवे तालुक्यात कृष्णेच्या तीरावर बोरगावजवळच आहे. आणि म्हणूनच या गावाचा उल्लेख बहे-बोरगाव असा केला जातो. “कृष्णा माहात्म्यात“ या गावाचा उल्लेख बाहुक्षेत्र असा केला आहे. बहे बोरगाव मारुती मंदिर बोरगाव जवळ कृष्णा नदीच्या काठावर स्थित आहेत. मंदिर "रामलिंग बेट" नावाच्या बेटावर आहे. हे मंदिर महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील वाळवा जवळ बहे येथे आहे. महाराष्ट्रातील चाफळ-सातारा परिसरातील श्री स्वामी समर्थ रामदासांनी स्थापन केलेल्या ११ मंदिरांपैकी हे एक आहे.
Send us a textDr. Kokila Patel, an Indian American physiotherapist, uses Iyengar Yoga to treat her patients. She focuses on posture, alignment, and breathing, using props like belts and blocks. Her approach helps relieve chronic pain and improves strength, flexibility, and mental well-being. Patients also learn simple home routines for lasting results. By blending physiotherapy with yoga, she offers a holistic and effective way to heal 50,000 + patients in America so far!
Send us a text"आईच्या खांद्यावरून तिच्या मऊ पदराखालून बघताना पाऊस एक वर्षाचा असतो.शाळेतून येताना छत्री मुद्दाम वाऱ्याच्या दिशेने धरून उलटी करन चिंब भिजताना पाऊस दहा वर्षांचा असतो!भिजायला नको वाटायला लागलं आणि आडोसा आवडायला लागला की पन्नाशी येते पावसाची..गुडघे दुखू लागले आणि डोक्यावर केस जाऊन चंद्रोदय झाला की साठीशांती होते पावसाची............असतं नं वय पावसाला ?"
Send us a textएकदा आमच्या सातव्या फ्लोअरवरच्या रेफ्युजी एरियात, आम्हा मुलांची पार्टी चालू होती रात्रीची. आम्ही जवळ जवळ विसेक मुलं - मुली होतो... आणि होते अर्थातच एकमेवं, चितळे काका. पिझ्झा, पावभाजीचा बेत होता... सॅाफ्ट ड्रिंक्स होती... मजा, मस्ती चाललेली. किशोर कुमारची दोनेक गाणी ऐकवून... वाहवा मिळवून... खुर्चीत बसले होते काका, पावभाजीची प्लेट हातात घेऊन. आणि... आणि अचानक कोसळले ते खाली. छातीला हात लावत कळवळू लागले ते. आम्हा मुलांचं तर अक्षरशः धाबं दणाणलं. कोणीतरी जाऊन चितळे काकूंना कळवलं. दोन्ही खांद्याभोवती पदर गुंडाळलेल्या काकू, गडबडीतच वर आल्या. एव्हाना चितळे काकांची हालचाल, पुर्ण बंद झाली होती. आणि पुढे जे काही आम्ही मुलांनी पाहिलं, ते निव्वळ अविश्वसनीय होतं...
Send us a textएकदा मोटरमनच्या कोचमधून प्रवास करत असताना एका मुलाने अगदी ऐन वेळेला ट्रॅक क्रॉस केला. थोडक्यात बचावला. ट्रेन साधारण ऐंशीच्या स्पीडला होती. मोटरमन भलताच वैतागला. खिडकीच्या बाहेर डोकं काढून त्या पोराला मजबूत शिव्या हासडल्या. म्हणाला, मादरचोद मेरी ही ट्रेन मिली थी क्या तुझे मरने के लिए? त्याचं हे बोलून होईपर्यंत गाडी बरीच पुढे निघून गेली होती. त्याचं बोलणं काय त्या मुलाला ऐकू जाणार नव्हतं. पण तरी मनातला राग व्यक्त करण्याचा त्याचा हा प्रकार होता.
Send us a textशाळेत असताना सुंदर अतिशय शांत मुलगा होता. तो कधीही आक्रमक नव्हता. पण अतिशय चौकस होता. त्याचे शिक्षक म्हणत,"सुंदर ची स्मरणशक्ती आरशासारखी आहे. एकदा डायल केलेला नंबर अथवा लिहिलेला कोड त्याचा तोंड पाठ होत असे."कधी कधी त्याचे शाळेतले मित्र त्याच्या जुन्या बुटांवरून आणि घरून आणलेल्या डब्यावरून त्याची टर उडवत असत. पण त्याने कधीही कोणालाही प्रतिउत्तर केले नाही. तो केवळ स्मित हास्य करत असे आणि तेथून काढता पाय घेत असे.
Send us a textविमान कोसळल्यानंतर त्याच्या अवशेषांमध्ये ब्लॅक बॉक्सचा कसून शोध घेतला जातो. हा सापडेपर्यंत शोधमोहीम थांबवली जात नाही. Air France Flight 447 – रिओहून पॅरिसकडे. अचानक रडारवरून गायब. अटलांटिक महासागरात कोसळले.विमानाचा शोध वर्षभर चालला. अखेर २०० मीटर खोल समुद्रात, Black Box सापडला आणि अपघाताची माहिती उघड झाली. बर्फामुळे सेन्सरने चुकीचा डेटा दिला, आणि वैमानिक घाबरला… चुकीचे निर्णय घेतले.Black Box शिवाय हे कधीच समजलं नसतं.
Send us a textफळं खाणे नक्कीच चांगले . ती खाण आरोग्यदायी अर्थात असत. ह्या गोष्टीत फळांचे गुणधर्म सांगून निसर्ग सर्वश्रेष्ठ कसा हे समजावले आहे.
Send us a textबसस्टॉप वरचा तो इसम मघापासून त्या युवती कडे नी तिच्या त्या गोल वाढलेल्या पोटाकडे अतिशय कुतूहलाने बघत होता. त्याने धीरानेच विचारलं, " अशा स्थितीत किती दिवस झाले तुम्हाला ? " "तुमच्या कुटुंबातील कोणीच नाहीये का तुमच्या जवळचं, तुम्हाला सांभाळून घेणारं ?" त्याने विचारले. " नाही, मी एकटीच रहाते वडिलांबरोबर. पण ते आजारी असतात. ...."
Send us a textतुम्ही मिस्टर बीन पाहिलाय का?अगदी पाहिलाच असेल! ते गोंधळलेलं तोंड, भिरभिरती नजर, हास्यास्पद हालचाली... आणि शब्द? नाहीच! एक शब्द न बोलता लोकांना पोट धरधरून हसायला लावतो.त्याचा IQ आहे १७८! आईनस्टाईनचा IQ होता १६०. म्हणजे तो किती हुशार होता, कल्पना करा.१९० देशांत मिस्टर बीन लोकप्रिय झाला कारण त्याला भाषेची गरजच नाही!
Send us a textशिबिराच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्राचा विषय होता "आनंदाने कसं जगावं?" मी साऱ्या शिबिरार्थींना एक कॉमन प्रश्न विचारला आणि नोटपॅडमधल्या कागदावर आपापलं उत्तर लिहून द्यायला सांगितलं. प्रश्न अगदी साधा होता,"तुमच्या मते, सुख म्हणजे काय?"आणि, आलेली उत्तरं अगदी भन्नाट होती.काय होती ती उत्तरं..?
Send us a text"काका मला निघायला हवे... आईला मदत करायची आहे." असे म्हणून कस्तुरी, प्रसन्नला कडेवर घेऊन लगबगीने निघाली... ती पाटी मात्र माझ्या डोक्यातून काही जाईना.. 'मला शिकायचंय....!! शिकण्यासाठी केव्हढी तपश्चर्या करावी लागतेय. सकाळी उठून आपल्या दीड वर्षाच्या भावाला घेऊन गळ्यातल्या सरस्वतीचा आविष्कार इतरांपुढे सादर करून, त्यात ही भीक न मागता.., फक्त एकच अपेक्षा, "मला शिकायचंय...!!"
Send us a textकिती अद्भुत आहे हे सगळं… आणि काही लोकांकरता अगम्य देखील ! म्हणतात ना, ‘मानो तो भगवान ; ना मानो तो पत्थर' … तसंच काहीसं ! पण गंमत अशी की – कोणी मान्य करा किंवा नका करू – या वास्तुपुरुषाला, या उर्जेला त्यामुळे काहीही फरक पडत नाही. त्याचं एकच काम आहे – त्या वास्तूत जे घडेल, जसं घडेल त्याला ‘तथास्तु' म्हणायचं
Send us a textशरीराची अनेक खाती स्वतःकडे असणारा आणि त्यांचा कारभार समर्थपणे सांभाळणारा अवयव म्हणजे यकृत! कारभार मोठा त्यामुळे आकारही मोठा आणि वजनदार आसामी, दीड किलो वजन असलेला ऐवज! कारभार तर एवढा मोठा की जवळ जवळ पाचशे वेगवेगळ्या प्रकारची कामे यकृत कोणताही गाजावाजा न करता शांतपणे हाताळत असते. जणू काही कर्मयोगीच! अशा कर्मयोग्याला (अप्रत्यक्षपणे) दारू पाजून आपण त्याच्या कामात अडथळा आणतो, त्याला त्रास देतो, त्याच्यावर जुलूम करतो. आपण करतो पण निस्तरावं लागतं यकृताला!
Send us a textदुकानदार डोळ्यांत तेल घालून थेंबाथेंबाचा तेलाचा दाम दसपटीने वसूल करत होता. एका फाटक्या परकर पोलक्यांतल्या पोरीने दुकानदाराकडे मातीची पणती ठेवली.ती म्हणाली, "येवढं पणतीभर द्या.""अग, दिवाळीला अवकाश आहे ! पणत्या कसल्या लावतेस?" पोरगी गांगरली. पण दारिद्रय धिटाई शिकवते."दिवाळी कसली? खायला त्याल द्या...""ह्या पणतीत?" दुकानदार म्हणाला.मुलीने हातातले दहा पैशाचे नाणे टेबलावर ठेवले. "यवड्या पैशात किती बसतं ते द्या""पण आमच्याकडे धाच पैशेच हाइत."'खायाचे तेल' परवडत नाही. आता पणतीचे आणि माझे नाते दिवाळीच्या रोषणाईशी होते ते तुटून गेले आहे.